Ad will apear here
Next
‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार
‘छोटी मालकीण’ मालिकेच्या स्पर्धेत सोन्याचा हार जिंकलेल्या प्रीती नांद्रे   कुटूंबीय आणि मालिकेतील कलाकारांसह

मुंबई :  टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं नुकताच हा सुखद अनुभव घेतला. स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधर या जोडीला भेटण्याची संधीही त्यांना मिळाली. 

 या मालिकेसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. यात  अचूक उत्तर देणाऱ्याला मानाचा सोन्याचा हार जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात नंदूरबारच्या प्रीती नांद्रे भाग्यवान विजेत्या ठरल्या. 

‘‘छोटी मालकीण’ ही मालिका मला फार आवडते. ही कॉन्टेस्ट जाहीर झाल्यावर मी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं आणि उत्तर दिलं. मात्र, मला बक्षीस मिळेल याची अपेक्षाच नव्हती. मानाचा सोन्याचा हार मिळणं हे माझ्यासाठी खरोखरच आनंददायी आहे. हा आनंद दिल्याबद्दल ‘छोटी मालकीण’ची मी आभारी आहे’, अशी भावना प्रीती नांद्रे यांनी व्यक्त केली.  

सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका प्रसारित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZWGBO
Similar Posts
‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याचा प्रत्यय देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणे हा आनंद त्यांना सुखावणारा होता
‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. याच निमित्ताने ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांमधील नायिकांनी भरभरून शुभेच्छा देतानाच स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण यांविषयी रोखठोक मते मांडली आहेत.
स्वप्नील जोशी निर्मितीत मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर  झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो
‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू मुंबई : आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचे चित्रण करण्यात आले आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असते, प्रेमाची भावना गुलाबी असते, असे दाखवण्यात आले. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू ‘स्टार प्रवाह’ ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेतून मांडणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language